एरंडोलमधील 61 लाखांच्या गांजा प्रकरणी सहा महिन्यानंतर म्होरक्या जाळ्यात


61 lakh ganja case in Erandol after six months, Mhorkya in jail एरंडोल : नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी तब्बल 61 लाखांचा गांजा पकडल्याची कारवाई एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारात केली होती मात्र मुख्य संशयित पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताच्या एरंडोल पोलिसांनी मध्यप्रदेशातील सेंधवा येथून मुसक्या बांधल्या आहेत. मेरसिंग खेरते (खरगोन, मध्यप्रदेश) असे अटकेतील संशयिताचे नाव असून संशयिताला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गांजा शेतीवर फिरवला बुलडोजर
खडकेसिम शिवारात असलेल्या शेतात तुरीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्यानंतर 4 नोव्हेंबर 2022 रोजी एरंडोल पोलिसांनी शेतात धाड टाकून 61 लाख 25 हजार रुपये किंमतीचा 875 किलो गांजा पकडला होता तर संशयित मेरसिंग खेरते हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला होता. संशयित मेरसिंग खेरते हा सेंधवा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी हवालदार अनिल पाटील, उमेश कुमावत हे सेंधवा येथे रवाना झाले. दोन दिवस पोलीस पथकाने सेंधवा येथे सापळा रचल्यानंतर मेरसिंग खेरते यास पकडण्यात यश आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !