कुसूंब्यातील तरुणाची जळगावात निर्घृण हत्या : तिघांना पोलिसांकडून अटक

कारण वाचून बसेल धक्का : दुचाकीची चावी न मिळाल्याने घडले हत्याकांड


Brutal murder of a youth from Kusumba in Jalgaon : Three arrested by the police जळगाव : दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने मित्रानेच धारदार शस्त्र मारून मित्राची हत्या केल्याची संतापजनक घटना खोटे नगर परीसरात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. सुरूवातीला हल्ल्यात तरुण अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र बुधवारी पहाटे तरुणाची प्राणज्योत मालवल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढवत तिघांना अटक केली. अविनाश निंबा अहिरे (35, कुसूंबा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

दुचाकीची चावीचा वाद बेतला जीवावर
खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी व मयत हे मित्र आहेत. खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्रासोबत आल्यानंतर संशयितदेखील आले. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर शाब्दीक वाद वाढत गेल्याने दीपकसह अन्य दोघांनी धारदार शस्त्र भोसकल्याने अविनाश हा गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

तिघांना तालुका पोलिसांकडून अटक
अविनाश अहिरे या तरुणाच्या खून प्रकरणी महेश पोपट सोनवणे (चंदूअण्णा नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित दीपक प्रकाश पाटील, साहिल खान, अमोल गवळी (पिंप्राळा, जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात भादंवि 307 लावण्यात आले असलेतरी नंतर तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यात 302 कलम वाढवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड
व तुषार जोशी यांनी तिघा आरोपींना अटक केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !