पाचोरा शहरात धाडसी घरफोडी : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास


Daring house burglary in Pachora City : 53 lakh worth of goods looted पाचोरा : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत दोन लाख 70 हजारांचा ऐवज लांबवला. पाचोरा शहरातील सिंधी कॉलनीत झालेल्या घरफोडीनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
पाचोरा शहरातील सिंधी कॉलनीत मनीव उद्धवदास वाधवाणी (37, सिंधी कालनी, मोंढाळा रोड, पाचोरा) वास्तव्यास आहेत. 4 ते 5 जून दरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे तसेच 70 हजारांची रोकड लांबवली. वाधवाणी गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक राहुल मोरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !