जळगाव अपर पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खात्याद्वारे पैशांची मागणी

प्रतिसाद न देण्याचे आवाहन चंद्रकांत गवळी यांचे नागरीकांना आवाहन


Demand for money through fake Facebook account in the name of Jalgaon Additional Superintendent of Police जळगाव : सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या लढवत नागरीकांना गंडा घालत असल्याचे उदाहरण ताजे असतानाच सायबर भामट्यांनी आता चक्क जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाचेच बनावट फेसबुक अकाउंट तयार करीत काहींना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोशल मीडियामधील अकाउंटला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (36, रा.नवीन पोलीस कॉलनी, ळगाव ) यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सायबर पोलिसात 7 जून रोजी फिर्याद दाखल केली आहे. 28 मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून त्याद्वारे पैशांची मागणी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !