जळगावात गॅस गळतीनंतर घरात आग : व्यापारी जखमी


House fire after gas leak in Jalgaon : businessman injured जळगाव  शहरातील तांबापूरा भागात गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर स्फोट होवून अचानक घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले तर 60 वर्षीय वयोवृद्ध व्यापारी भाजला गेला. बुधवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

गॅस गळतीनंतर लागली आग
शहरातील तांबापूरा भागातील महादेव मंदिराजवळ व्यापारी पोपट सीताराम गव्हाळे (60) हे वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर घराला आग लागली. या आगीत गव्हाळे यांच्या हाता-पायाला ईजा झाल्याने ते जखमी झाले तर घरातील संसारोपयोगी वस्तू जळूक खान झाल्या. तपास हवालदार नितीन पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !