सुनसगाव शिवारातून नऊ टन वजनाच्या लोखंडी पाट्या चोरट्यांनी लांबवल्या
Iron plates weighing nine tons were stolen by thieves from Sunasgaon Shivar भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील वाघूर नदीवर पाणी अडवण्यासाठी टाकलेल्या नऊ टन वजनाच्या नऊ लोखंडी पाट्या चोरट्यांनी लांबवल्या. ही धक्कादायक घटना 25 मे ते 5 जून दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ गुन्हा तालुका पोि लसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिनाभरानंतर चोरी उघडकीस
लघू पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम साहेबराव पाटील (27, खडका चौफुलीजवळ, भुसावळ) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सुनसगाव शिवारातील वाघूर नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला असून पाणी अडवण्यासाठी 90 किलोग्रॅम वजनाच्या एकूण नऊ लोखंडी पाट्या अंथरण्यात आल्या होत्या मात्र अज्ञात चोरट्यांनी संधी साधून महिनाभराच्या कालावधीत त्या लांबवल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दीपक जाधव करीत आहेत.


