भुसावळातील विवाहितेचा कारसाठी पाच लाख न आणल्याने छळ : जळगावच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा


Harassment of a married woman in Bhusawal for not bringing five lakhs for a car : A case against five people including the husband of Jalgaon भुसावळ  : कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने भुसावळ येथील माहेर व जळगाव शहरातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी जळगावातील पतीसह पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयितांविरोधात गुन्हा
विवाहिता रोशनआरा तवकल पटेल (23, गेंदालाल मिल, जळगाव, ह.मु.पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीसह आरोपींनी कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने शिविगाळ करीत दमदाटी केली तसेच गांजपाठ केला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. या प्रकरणी पती तवकल ईस्माईल पटेल, सासू वहिदा ईस्माईल पटेल, सासरे ईस्माईल लुकमान पटेल, दीर तौफिस ईस्माईल पटेल, बईमा ईस्माईल पटेल (सर्व रा.गेंदालाल मिल, जळगाव, ह.मु.फातेमा नगर, मेहबूब किराणाजवळ, जळगाव) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक अर्चना अहिरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !