सुप्रीम कॉलनीतील तरुणाची गळफास घेत आत्महत्या


A youth in Supreme Colony committed suicide by hanging himself जळगाव  :शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील 36 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. नैराश्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कैलास जानराव कोळी (36, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नैराश्यातून घटनेचा अंदाज
मयत कैलास हा तरुण हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता शुक्रवारी सकाळी 10 वाजता घरी कुणीही नसताना त्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे सीएमओ रेणूका भंगाळे यांनी तरुणाला मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयत कैलास कोळी याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, 1 भाऊ, बहिण असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !