जळगावातील व्यापार्‍याची सोशल मिडीयातून अश्लील फोटोंद्वारे बदनामी


Jalgaon businessman defamed through obscene photos on social media जळगाव  : शहरातील 66 वर्षीय व्यापार्‍यासह त्याच्या परीवाराची सोशल मिडीयात अश्लील फोटो टाकून बदनामी करण्यात आल्याची संतापजनक घटना 1 रोजी घडली. या प्रकरणी व्यापार्‍याने जळगाव सायबर सेलमध्ये तक्रार दिल्यानंतर 9689060014 या क्रमांकाच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील फोटो टाकून बदनामी
जळगावातील एका भागात 66 वर्षीय व्यापारी कुटूंबासह वास्तव्यास आहे. संशयित क्रमांकाच्या आरोपी मोबाईलधारकाने व्यापार्‍यासह कुटूंबाची बदनामी होईल, अशा पद्धत्तीने सोशल मिडीयावर अश्लील फोटो टाकून बदनामी केली. 1 जून रोजी हा प्रकार घडल्यानंतर व्यापार्‍याला हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित मोबाईल वापरकर्त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !