जामडीतील फकिराचा खून : अल्पवयीनासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा
Fakira’s murder in Jamdi : Murder case against four including a minor जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथे फकिर तरुणाची बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणाने चाकूचे वार करीत हत्या केली होती. या प्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेतल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जामडीत फकिर तरुणाची हत्या : चौघांविरोधात गुन्हा
जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्या तबरेज शहा याकूब शहा (34, जामडी) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. हा राग डोक्यात ठेवून तरुणीच्या अल्पवयीन भावाने गुरुवारी दुपारी तरुणावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. तरुणाच्या खुनानंतर संतप्त नातेवाईकांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटकेची मागण केली होती.
चौघांविरोधात खुनाचा गुन्हा
खून प्रकरणी अजमल शहा याकूब शहा (34, जामडी) यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीनासह भिकन अजीज शेख, एजाज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख (सर्व जामडी, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी अल्पवयीनास ताब्यात घेत बालन्याय मंडळापुढे हजर केले. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


