चिंचखेडे शिवारातील खुनाचे धक्कादायक कारण समोर : घरखर्चालाही पैसे देत नसल्याने पित्याची केली हत्या : आरोपी मुलांना अटक


The shocking reason for the murder in Chinchkhede Shiwar is revealed : Father was killed for not paying house expenses: Accused children arrested चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावातील रहिवासी राजेंद्र सुकदेव पाटील (55, रा.देवळी, ता.चाळीसगाव) यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी त्यांची दोन्ही मुलेच आरोपी असल्याचे निष्पन्न केले होते. संशयित मुकेश रवींद्र पाटील (23) व राकेश रवींद्र पाटील (21, दोन्ही रा.देवळी) यांना अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कौटुंबिक वादातून हत्या
सुरुवातीला मुलांनी अज्ञातांनी वडिलांची हत्या केल्याचा बनाव केला होता मात्र घटनास्थळावरील पुरावे व संशयितांच्या सांगण्याच्या पद्धत्तीवर पोलिसांचा संशय बळावल्यानंतर आरोपी मुलेच असल्याचे स्पष्ट झाले. वडिल घर खर्चासाठी पैसे देत नव्हते शिवाय शेतात काम करवून घेत होते तसेच आईसह मुलांना शिविगाळ करीत असल्याने दोन्ही मुलांनी मध्यरात्री शेतात जावून वडिलांचा काटा काढल्याची कबुली दिली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, मेहुणबारे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, चाळीसगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक मिलिंद शिंदे व कर्मचार्‍यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !