चिनावल गावातील तरुणाच्या खुनाची अखेर उकल : मुक्ताईनगरातील दोघा तरुणांना अटक


The murder of a youth in Chinawal village is finally solved : Two youths from Muktai Nagar have been arrested मुक्ताईनगर : शहरातील सातोड शिवारातील सीताराम बिचकुले यांच्या शेत गट क्रमांक 127 समोरील नाल्यात चिनावल, ता.रावेर येथील रवींद्र मधुकर पाटील (46) या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना 6 जून रोजी रोजी सकाळी उघडकीस आली असलीतरी मयताचा दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा संशय होता. मुक्ताईनगर पोलिसांनी या खुनाची उकल केली असून शहरातीलच दोघा आरोपींना अटक केली आहे. राहुल संतोष काकडे (25, रेणुकानगर, रेणुकामाता मंदिरामागे, मुक्ताईनगर) व योगेश गजानन काकडे (19, जुनेगाव, जुन्या उर्दू शाळेजवळ, मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

15 हजारांसाठी फिरली नियत
4 जून रोजी संशयित सोबत होते व मयत रवींद्रकडे 15 हजारांची रोकड असल्याने ती पाहून आरोपींची नियत बदलली व त्यांनी बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील नाल्यात नेत रवींद्रला बेदम मारहाण केली तसेच डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला रक्कम लुटून कल्याणकडे पळ काढला. कल्याण पोलिसांच्या मदतीने स्थानिक मुक्ताईनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो कुलकर्णी, गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, उपनिरीक्षक संदीप चेढे, शैलश चव्हाण, संतोष नागरे, कांतीलाल केदारे, नितीन चौधरी, देवसिंग तायडे, धर्मेंद्र ठाकूर, विजय पढार, संजय पवार, संदीप खंडारे, विनोद सोनवणे, सुरेश पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र धनगर, मुकेश महाजन, अमोल जाधव, अंकुश बाविस्कर, विजय कचरे, सचिन जाधव, प्रशांत चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !