तीन तासात लॅपटॉप चोरटे जाळ्यात : चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी


Laptop thieves in Chalisgaon city police net चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी तीन तासांच्या आत लॅपटॉप चोरट्यांना पकडत बेड्या ठोकल्या. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.॥ येथील एका शासकीय कार्यालयातून एक लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप चोरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

तीन तासातच आरोपी जाळ्यात
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.॥ येथील औद्योगिक वसाहतीतील भारत वायर रोपमधील प्रशासकीय कार्यालयातून एक लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप शुक्रवार, 9 मे रोजी सायंकाळी 5.30 ते ते 10 मे रोजी सकाळी 9.30 वाजेदरम्यान चोरीला गेले. याबाबत कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक रणधीर परदेशी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली होती. चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस नाईक राहुल सोनवणे हे तपास करीत असताना चोरीचे लॅपटॉप दोघे जण विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती डीबीचे पोलीस नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोष कोल्हे (18) व भूषण सुनील मुंगसे (19, दोन्ही रा.खडकी बु.॥, ता.चाळीसगाव) यांना शनिवारी रात्री ताब्यात घेतल्यानंतर पोलीस चौकशीत संशयितांनी लॅपटॉप चोरीची कबुली देत लॅपटॉप काढून दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !