अडावदला टँकर चालकास मारहाण करीत मोबाईलसह चार हजार लूटले : चौकडीविरोधात गुन्हा
अडावद : जेवणासाठी आलेल्या टँकर चालकास मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल व चार हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना अडावद येथील शुभम हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चालकाला लुटल्याप्रकरणी गुन्हा
जीवन धनसिंग गांगोली (29, धमासा, विमरोड, जि.डोलरीया, जि.होशंगाबाद, मध्यप्रदेश) हे टँकर चालक असून शुक्रवारी रात्री अडावद येथील शुभम हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्यानंतर संशयित सागर भीमराव महाजन (24, इंदिरानगर, अडावद) याच्यासह अन्य तीन अनोळखींनी जीवन यांना मारहाण करीत त्यांच्याकडील पाकिट हिसकावले तसेच खिशातील मोबाईल जबरीने काढून घेतला. गांगोली यांनी अडावद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक कैलास बाविस्कर करीत आहेत.


