नगरदेवळा सूतगिरणीत पाच लाखांची चोरी


Theft of five lakhs in Nagardevla yarn mill नगरदेवळा : नगरदेवळा सूतगिरणीत चोरट्यांनी प्रवेश करीत लोखंडी अँगल गॅस कटरने कापत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 9 जून रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी हा प्रकार घडला.

संशयित पोलिसांच्या नजरेत
सूतगिरणीचे वॉचमन कर्णसिंग नरसिंग पाटील (75, वडगाव सतीचे, ता.पाचोरा) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी सुतगिरणीच्या छताचे 20 हजारांचे भंगार, 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी, 10 हजार रुपये किंमतीचे ऑक्सीजन सिलिंडर, दोन हजारांचे सिलिंडर व तीन हजारांचे गॅस कटर तसेच चार लाख रुपये किंमतीची चारचाकी लांबवली. दरम्यान, या गुन्ह्यात दोन संशयित निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच अटक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !