पिशवीत दोन लाख ठेवल्याचे सांगत जळगावात वृद्धेची पोत लांबवली
In Jalgaon, the old woman was dragged away saying that she kept two lakhs in a bag जळगाव : रस्त्याने पायी चालणार्या वृद्धेला कापडात दोन लाख रुपये ठेवल्याचे सांगत बोलण्यात गुंतवणूक दोघा भामट्यांनी 42 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत लांबवली. ही घटना जळगाव शहरातील गांधी मार्केटजवळ घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
बोलण्यात गुंतवत लांबवले दागिणे
शहरातील पिंप्राळा परीरसरातील मयूर कॉलनीत भागीरथाबाई रामा बारी (वय- 65) या वास्तव्यास असून त्यांचा मोठा मुलगा हा शहरातील चौघुले प्लॉट येथे वास्तव्यास आहे. मोठ्या मुलाला भेटण्यासाठी त्या शनिवारी सकाळी घरातून निघाल्या होत्या असता सकाळी 10 वाजेच्या सुमारास टॉवर चौकात उतरल्यानंतर त्या मुलाच्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याने पायीच निघाल्या असता त्यांच्यासोबत एक महिला आणि पुरूष सुध्दा पायी चालत आले. वृद्ध महिलेसोबत चालणार्या त्या महिलेने बारी यांना सांगितले की, आपण गांधी मार्केट येथे थोडावेळ बसू या. त्यानुसार एका दुकानासमोर तिघे त्याठिकाणी बसले.
संशयित महिलेने एक कापडी पिशवी बारी यांच्या हातात दिली. यामध्ये दोन लाख रुपये आहे, असे सांगून त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत वृद्धेने पिशवी सोबत ठेवली गळ्यातील 36 हजार रुपये किंमतीची पोत आणि सहा हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स काढल्यानंतर संशयित पुरूषाने ते ताब्यात घेवून पोबारा केला.
पिशवीत निघाली वहीची पाने
पिशवीमध्ये काय आहे म्हणून बारी यांनी जवळच असलेल्या फुल विक्रेल्या मुलाला पिशवी देवून ती उघडण्यास सांगितली. पिशवी उघडताच त्यामध्ये कोर्या वह्यांची फाटलेली पाने निघाली. वृध्द महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.


