जळगावात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीचा विनयभंग


A young woman pursuing medical education was molested in Jalgaon जळगाव : छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणी वैद्यकीय शिक्षणासाठी जळगावात आली असून एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. या तरुणीच्या मोबाईलवर रात्री-बेरात्री कॉल करून तसेच गर्ल्स हॉस्टेलभोवती बुलेटद्वारे चकरा मारून संशयित रवींद्र खेडकर याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना 10 जून रोजी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केले तब्बल 31 कॉल्स
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणी ही जळगावातील रामानंदनगर परीसरातील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये वास्तव्याला आहे. सध्या तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असून शनिवारी 10 जून रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्र खेडकर याने तरुणीच्या फोनवर कॉल करीत तिला सिल्व्हर पॅलेस हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले तसेच 11 जून रोजी रात्री दोन ते साडेतीन दरम्यान तब्बल 31 वेळा तरुणीला कॉल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !