जामनेरात पंचायत समिती अधिकार्याचे घर फोडले : 70 हजारांचा ऐवज चोरीला
Jamner Panchayat Samiti officer’s house broken into : 70 thousand stolen जामनेर : शहरातील नाहाटा नगर, हिवरखेडा रोड भागातील पंचायत समितीच्या महिला अधिकार्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
जामनेर पंचायत समितीला सोनल प्रमोद पाटील (32, जामनेर, मूळ रा.सोनगीर, ता.धुळे) या कार्यरत असून कामानिमित्त त्या बाहेरगावी गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 11 ते 12 जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश करीत 24 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या रींगा, सहा हजार रुपये किंमतीची कानातील बाळी व 30 हजार रुपये किंमतीचे मोठे कडे व जोडवे असा एकूण 69 हजारांचा ऐवज लांबवला. सोनल पाटील या गावाहून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार अनिल चाटे करीत आहेत.


