जळगावच्या गणपती नगरात धाडसी घरफोडी : साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला
Bold burglary in Jalgaon’s Ganapati Nagar : Three and a half lakhs worth of cash stolen जळगाव : शहरातील गणपती नगरात बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी सव्वादोन लाखांच्या रोकडसह तब्बल तीन लाख 58 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात दिवसागणिक होणार्या चोर्या-घरफोड्यांमुळे नागरीक धास्तावले आहेत. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरांना टार्गेट
विशाल नरेंद्र जैन (45, प्लॉट नंबर 13, मनिषा कॉलनी, गणपती नगर, सुमंगल कार्यालयामागे, जळगाव) हे 9 ते 12 जूनदरम्यान परीवारासह नागपूरात गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सव्वादोन लाखांची रोकड व एक लाख 33 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे लांबवले. जैन हे गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रामानंद पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, निरीक्षक शिल्पा पाटील आदींनी भेट देत पाहणी केली. तपास उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.


