धोंडखेडा येथील तरुणावर विळ्याने हल्ला : चौघांविरोधात गुन्हा


Attack on young man from Dhondkheda with sickle : Crime against four बोदवड : तालुक्यातील लोणवाडी रस्त्यावरील शेतात बोअरवेल करण्यासाठी गेल्यानंतर संशयितानी वाद घालत बोअरवेल करू देण्यास विरोध करीत विळ्याने हल्ला करीत शिविगाळ केली तसेच काठ्यांनी मारहाण केल्याची घटना रविवार, 18 जून रोजी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
विरेंद्र मोहन पाटील (28, धोंडखेडा, ता.बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे लोणवाडी रस्त्यावर शेत गट क्रमांक 271/6 असून त्यांचे मावस भाऊ श्रीकृष्ण अशोक पाटील हे रविवारी बोअरवेल करण्यासाठी शेतात गेल्यानंतर संशयिताने बोअरवेल करू देण्यास नकार देत वाद घातला व शिविगाळ करून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली तसेच तक्रारदाराचे मावसभाऊ श्रीकृष्ण पाटील यांना संशयित उद्धव पाटील याने हातातील विळ्याने डाव्या हाताच्या मनगटाजवळ मारून दुखापत केली. या प्रकरणी योगेश नारायण पाटील, धीरज विलास पाटील, उद्धव मंगलसिंग पाटील, कुणाल गणेश पाटील (सर्व रा.धोंडखेडा, ता.बोदवड) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !