भुसावळातील कापड व्यावसायीकाची मॉडर्न रोडवरून दुचाकी लांबवली
The bike of a textile trader in Bhusawal was dragged from Modern Road भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. शहरातील मॉडर्न रोडवरील गुरुनानक दुकानाच्या पाठीमागील भागातून कापड दुकान चालवणार्या व्यावसायीकाची दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याची घटना 3 ते 4 जून दरम्यान घडली. या प्रकरणी तिलोकचंद्र मोटूमल मनवाणी (59, सिंधी कॉलनी, मोठ्या सेवा मंडळाजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानाजवळून लांबवली दुचाकी
मनवाणी यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डब्ल्यू.6901) ही गुरुनानक दुकानाच्या पाठीमागील भागात उभी केल्यांतर चोरट्याने संधी साधली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न मिळाल्याने मनवाणी यांनी तक्रार दाखल केली. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.