पूरनाड येथील शेतकर्‍याची दुचाकी लंपास


मुक्ताईनगर : तालुक्यातील पूरनाड येथील शेतकर्‍याची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून लांबवल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिनेश रामभाऊ पाटील (44, पूरनाड) हे शेतकरी असून त्यांच्याकडे कामासाठी पल्सर दुचाकी (एम.एच.19 ए.ए.19) आहे. दुचाकी त्यांनी घराबाहेर पार्क केल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी संधी साधली. तपास नाईक विकास नायसे करीत आहेत.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !