जळगावातील व्यापारी सेक्सटॉर्शनचा बळी : पावणेआठ लाखांची खंडणी उकळली


Jalgaon businessman sextortion victim : Extortion of fifty eight lakhs जळगाव : फेसबुकद्वारे सुरूवातीला महिलेने रीक्वेस्ट पाठवल्यानंतर व्यापार्‍याने ती अ‍ॅप्सेप्ट करीत चॅटींग सुरू केल्याने महिलेने अश्लील व्हिडिओ कॉल केल्यानंतर व्यापार्‍यानेदेखील त्यास प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी ती अश्लील चित्रफित बनवली व त्याआधारे नंतर ब्लॅकमेल करीत जळगावच्या 51 व्यावसायीकाकडून तब्बल सात लाख 77 हजार 777 रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍याने सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
51 वर्षीय पीडीत व्यापार्‍याच्या तक्रारीनुसार, 16 ते 19 जून 2023 च्या त्यांच्या फेसबुकवर अनोळखी फेसबुक खातेधारक रीया अग्रवाल नामक महिलेने ओळख निर्माण केली. त्यानंतर मेसेंजवर चॅटींग व व्हिडिओ करीत कामोद्दीपक भावना उत्तेजीत केल्या व तक्रारदाराचा नग्न व्हिडिओ तयार केला. अनोळखी महिलेने पैशांची मागणी सुरू करीत पैसे न दिल्यास हा नग्न व्हिडिओ युट्यूब व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी एयु स्मॉल फायनान्स बँक व गुगल पे द्वारे सात लाख 77 हजार 745 रुपये उकळले. त्यानंतरही मागणी वाढतच चालल्यानंतर व्यापार्‍याने जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !