जळगाव विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत
Welcome to Deputy Chief Minister Devendra Fadnavis at Jalgaon Airport जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मंगळवारी दुपारी जळगावात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, लता सोनवणे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, चंदुलाल पटेल, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनीही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

