रावेर तालुक्यात नदी-नाल्यांना पूर ; चारचाकी वाहिली

अनेक गावांमध्ये शिरले पूराचे पाणी : रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला


Flooding of rivers and canals in Raver taluka ; Four-wheel drive रावेर : शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावातील घरात पाणी शिरले तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेरशी संपर्क तुटला. येथील पुलावरून वाहणार्‍या पुरात एक चारचाकी वाहन वाहून गेली असून मात्र या वाहनातील दोघांना उड्या मारल्याने आल्याने ते बचावले आहे. तालुक्यात सकाळपासून सतत नऊ तास पाऊस झाला. तहसीलदार बंडू कापसे पूर परीस्थितीची पाहणी केली.

जुन्या नागझिरी पुलावरून वाहतूक बंद
रावेर तालुक्यात बुधवारी सकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. सतत नऊ तास पाऊस झाल्याने रावेर शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला पूर आला. दक्षता म्हणून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी जुना सावदा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला तसेच सातपुड्यात झालेल्या पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनोन केले आहे.

चारचाकी वाहिले : दोघे बचावले
रावेर-अजंदा रस्त्यावरील अजंदा गावानजीक असलेल्या नदीला पूर आला असून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून वॅगनर ही चारचाकी वाहत असल्याचे येथील तरुणांना दिसताच त्यांनी धाव घेतल्याने चारचाकीतील सुदैवाने दोघांचा जीव वाचला. चारचाकी गाडी मात्र पुरात वाहिली. समीर मन्यार, रोहित तडवी, तुषार सोनार, सुमित पाटील या तरुणांनी मदतकार्य केले.

अनेक गावांचा संपर्क तुटला
उटखेडा येथील नाल्याला पूर आल्याने संपूर्ण बसस्थानक परीसर पाण्याखाली गेला आहे. सुकी नदीला पूर असल्याने उटखेडा-कुंभारखेडा, पाल-खिरोदा, या रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. शिंदखेडा रावेर रस्त्यावर पुलावर पाणी आल्याने रावेर शहरांशी संपर्क तुटला आहे. पातोंडी येथील वाय पॉइंटवर पाणी निंभोरासीम, खिरवड, नेहेता, दोधे व रावेरकडे येणारी वाहतूक खंडित झाली आहे. पूनखेडा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव भोकर नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून खचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सावदा- थोरगव्हाण रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी काही घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याचे समजते. विवरे येथील वाघाडी नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी आहे. त्यामुळे नागरीकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !