भुसावळातील जनकपूरी नगरात घरफोडी : 18 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Janakpuri town of Bhusawal: 18 thousand in lieu of compensation भुसावळ : शहरात चोर्यांसह घरफोड्यांचे सत्र कायम असून जनकपूरी नगर, बालाजी टोलनाक्यामागील भागात घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात घरफोड्यांचे सत्र कायम
विनयकुमार ज्ञानोबा सोनवणे (30, जनकपूरी नगर, प्लॉट क्रमांक 23, बालाजी टोलनाक्यामागे, भुसावळ) हे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. चोरट्यांनी त्यांच्या घरामागील लोखंडी ग्रील कशाच्यातरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करीत 18 हजारांचा सामान लंपास केला. ही घटना 23 एप्रिल ते 28 जून दरम्यान घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बुधवार, 19 जुलै रोजी तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहेत.
