फैजपूर शहरातील अल्पवयीनाचा सर्पदंशाने मृत्यू


Minor died of snakebite in Faizpur city यावल : फैजपूर शहरातील खंडेराव मंदिराच्या मागे असलेल्या परदेशी वाड्यात घरात झोपलेल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलाचा सर्पदंशने मृत्यू झाला. मध्यरात्री घरात असतांना या मुलाला सर्पदंश झाला त्याला तातडीने तपासणीसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मयत मुलगा हा मुळचा हिंगोणा, ता.यावल येथील रहिवासी आहे. फैजपूर शहरात खंडेराव वाडी आहे. या खंडेराव वाडीच्या मागे परदेशी वाडा असून तेथील परदेशी वाड्यामध्ये हिंगोणा गावातील आदिवासी बारेला कुटूंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दरबार बिरलाल बारेला (9) हा बालक झोपला असताना झोपेतच या बालकाला सापाने दंश केला. हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यावर बालकाला यावल रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तेथे डॉ.शिवदास चव्हाण यांनी तपासणी करून बालकास मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्‍हाटे, महेंद्र महाजन करीत आहे. बालकावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीया सोपवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !