भालोदच्या 29 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


A 29-year-old married woman of Bhalod committed suicide by hanging herself यावल : यावल तालुक्यातील भालोद गावातील 29 वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचेे कारण अस्पष्ट
भालोद गावातील रहिवासी रेषमा अनिल वानखेडे (29) ही महिला आपल्या घरी असताना तिने मुख्य हॉलमध्ये लावलेल्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !