भुसावळातील तरुणाची विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या
Bhusawal youth commits suicide by consuming poisonous medicine भुसावळ : शहरातील 38 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भीमराव गंभीर तायडे (38, काशीराम नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भीमराव तायडे यांनी 19 रोजी क्लोरोपायरी हे विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना शहरातील डॉ.मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना 20 रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक जाकीर मन्सुरी करीत आहेत.
