रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : 12 रुपयांमध्ये भुसावळसह खंडवा व मनमाडमध्ये मिळणार जेवण


Big relief for railway passengers: Meals will be available in Khandwa and Manmad with Bhusawal for Rs 12 भुसावळ : रेल्वे प्रवाशांसाठी आता केवळ 12 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येत असून पहिल्या टप्प्यात भुसावळसह खंडवा व मनमाड रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन्ही स्थानकांवर जेथे जनरल डबे थांबत असतील तेथे हे जेवण उपलब्ध असेल, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. अल्प दरात जेवण उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

रेल्वे बोर्डाकडून उपायययोजना
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळसह मनमाड व खंडवा या तीन रेल्वे स्थानकांचा पहिल्या टप्यात समावेश करण्यात आला. अवघ्या 12 रुपयात प्रवाशांना आता पुरी-भाजीचे जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेल्वेने दूरवरचा प्रवास करणार्‍या गोरगरीब प्रवाशांना कमी पैश्यात जेवण उपलब्ध झाल्याने त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. रेल्वे बोर्डाकडून विशेष उपाय योजना करण्यात आल्या असून यासाठी जनरल डब्याच्या बाहेर आता अल्पदरात जेवणाचे स्टॉल गुरूवारपासून सुरू करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात तीन स्थानकांचा समावेश
रेल्वे बोर्डाच्या नियमानुमार पहिल्या टप्यात भुसावळ विभागातील खंडवासह भुसावळ व मनमाड या तीन रेल्वे स्थानकावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नंतर अन्य स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांना कमी दरात जेवण उपलब्ध होणार आहे.

20 रुपयांमध्ये किफायती भोजन
किफायती भोजन 20 रुपयात मिळणार आहे. यात (सात पुरी 175 ग्रॅम, बटाटा भाजी 150 ग्रॅम, लोणचे 12 ग्रॅम) असे राहणार आहे. कोम्बो भोजन 50 रुपयात मिळणार आहे. यात राजमा, छोले, चावल कॅसेरोल 350 ग्रॅम, खिचडी 350 ग्रॅम, पावभाजी 350 ग्रॅम, मसाला डोसाही 350 ग्रॅम मिळणार आहे. रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रवाशांना पॅकबंद खोक्यात जेवण दिले जात आहे. भुसावळ जंक्शनवर पहिल्याच दिवशी सुमारे 100 प्रवाशंनी याचा लाभ घेतला. मनमाड व खंडवा येथे सुध्दा प्रत्येकी 90 पेक्षा जास्त प्रवाशांनी लाभ घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !