धार गावातील प्रौढाची आत्महत्या
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील धार येथील बापू दयाराम भील (45) या प्रौढाने शुक्रवार, 21 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेतला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
पोलिसात नोंद
सोगन भाईदास भील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल नेहा बारेला करीत आहेत. खर्दे कामतवाडी येथील अशोक कोळी यांचा पातोंडा येथील हॉटेल देवजवळ अकस्मात मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
