भुसावळातील मुसाफिरखान्यात मोबाईल चोरी : चोरट्याला सहा महिन्यांची शिक्षा
Mobile phone theft in Musafirkhana in Bhusawal : Thief sentenced to six months भुसावळ : भुसावळ स्थानकावरील मुसाफिर खान्यात रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवासी झोपल्यानंतर त्याच्याकडील नऊ हजार 500 रुपयांचा मोबाईल चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी संशयीताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रेल्वे न्यायालयात संशयित आरोपीला सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रवासी झोपताच लांबवला मोबाईल
भुसावळ रेल्वे स्थानकावर 20 जानेवारी 2023 या दिवशी अप गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करून छत्रपती संभाजी नगरला जाण्यासाठी फिर्यादी मनिषकुमार छबुलाल यादव (रा.बेलबनिया, जि.संतकबीर नगर, उत्तर प्रदेश) हे भुसावळ रेल्वे स्थानकावर रात्री मुसाफिर खान्यात ओट्यावर आराम करीत असताना त्यांना झोप लागली व ही संधी साधून त्यांच्या खिश्यातील नऊ हजार 500 रुपयांचा मोबाईल लांबवण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे हवालदार जगदीश ठाकूर, धनराज लुले, रेल्वे सुरक्षा बलाचे महेंद्र कुशवाह, इमरान खान हे संयुक्तरीत्या स्टेशन परीसरात रात्रीगस्त करीत असताना संशयित आरोपी नासीर खान बाबू खान (50, गल्ली नंबर दोन, नाशिक) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मोबाईल आढळल्याने त्यास अटक करण्यात आली व रेल्वे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
आरोपीला सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा
रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार साळुंके यांनी आरोपीला सहा महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तपास पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, डीवायएसपी मारूती पंडीत, निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगदीश ठाकूर यांनी केला.
