भुसावळ शहरात अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन


भुसावळ : शहरातील बाजारपेठेतील भारत मेडिकलजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे भूमिपूजन रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. सूर्यवंशी हे स्वखर्चातून या स्मारकाची उभारणी केली आहे.

1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी या स्मारकाचे अनावरण होईल, असे राजूभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले. स्मारकाच्या कामाला वेगात सुरूवात झाली आहे. यावेळी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, डॉली वानखेडे, विकी वलकर, संतोष ठोकळ व मातंग बांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !