भुसावळातील रोटरी रॉयल्सतर्फे छोट्या उद्योजकांना सोलर लाईट वाटप
Distribution of solar light to small entrepreneurs by Rotary Royals in Bhusawal भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स आणि सिद्धेश टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील रस्त्यावर दुकान लावणार्या चर्मकार बंधू-भगिनी तसेच गरीब सलून चालकांना सायंकाळी उशिरापर्यंत काम करता यावे म्हणून सोलर लॅम्प विथ टॉर्चचे वाटप करण्यात आले.
शहरातील विविध भागांतील गरीब दुकानदारांना 50 सोलर लाईटांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे भुसावळ तालुकाध्यक्ष संजयसिंग चव्हाण, डॉ.जगदीश पाटील, रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष अनंत वाटपाडे, सेक्रेटरी महेश फालक, उपाध्यक्ष गणेश फेगडे, माजी अध्यक्ष राजेंद्र यावलकर, रमेश पांडव आदी सदस्य उपस्थित होते.

