सांगवी खुर्द येथे इंजवाय नदीत अवैध गौणखनीज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


At Sangvi Khurd, a tractor carrying illegal secondary minerals was caught in the river Injoy यावल : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे इंजवाय नदीत अवैध गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभत्तगाच्या पथकाने पकडले. ट्रॅक्टर चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने संबंधीत ट्रॅक्टर ताब्यात घेवून यावल तहसील कार्यालयात जमा करीत मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
सांगवी खुर्द, ता.यावल या गावातील इंजवाय नदीतून अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करतांना ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए.पी.2715) महसूलच्या पथकास दिसताच पथकाने ट्रॅक्टर थांबवले. चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना मागितला असता परवाना नसल्याने हे ट्रॅक्टर ताब्यात घेत यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले. ट्रॅक्टर मालक अमोल कोळी (रा.भालशीव) यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मिलिंद देवरे, मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी भारत वानखेडे, ईश्वर कोळी, वसीम तडवी, शरद सूर्यवंशी, विलास नागरे, समीर तडवी, कोतवाल हरीश चौधरी यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !