थोरगव्हाण-साकळी रस्त्यावर फॉर्च्यूनर चालकाची एस.टी. चालकाला मारहाण


Fortuner driver’s ST on Thorgavan-Sakli road ; Beating the driver यावल : यावल तालुक्यातील थोरगव्हाण-साकळी रस्त्यावर साकळीच्या महादेव मंदिराच्या समोर एस.टी.बस चालकाला फॉर्च्यूनर वाहन चालकाने शिवीगाळ करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फॉर्च्यूनर चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल
थोरगव्हाण ते साकळी रस्त्यावर यावल एसटी आगारातून एस.टी. बस (क्रमांक एम.एच.14 बी.टी.2705) घेऊन चालक नटराज शंकर साळुंखे (48) हे यावल ते थोरगव्हाणसाठी बस घेवून मनवेल रोडवरून जात असताना महादेव मंदिराच्या समोर फॉर्च्यूनर वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.एम. 5656) वरील अज्ञातचालकाने एस.टी. बस थांबवत एस.टी.चालक नटराज साळुंखे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावल पोलीस ठाण्यात नटराज साळुंखे यांच्या फिर्यादीवरून फॉर्च्यूनर वाहन क्रमांक (एम.एच.19 सी.एम.5656) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !