भुसावळातील युवतीला अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग


भुसावळ : शहरातील एका भागातील 19 वर्षीय युवतीला अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करीत विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवार, 22 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली.

पीडीतेने या प्रकरणी याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिल्यानंतर गोपाळ रमेश नवले (अशोक नगर, नाहाटा कॉलेजजवळ, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 19 वर्षीय युवतीच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी नवले याने पीडीतेच्या मनाला लज्जा निर्माण होईल अशा पद्धत्तीने आरोपीने अश्लील व्हिडिओ पाठवत तिचा विनयभंग केला. तपास पोलीस नाईक महेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !