यावल भाजपा शहराध्यक्षपदी निलेश गडे
यावल : प्रगतीशील शेतकरी व युवा सामाजिक कार्यकर्त निलेश सुरेश गडे यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 22 जानेवारी रोजी सकाळी पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक हिरालाल व्यंकट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शहराध्यक्ष पदाकरीता विद्या सुर्यकांत पाटील , बबलु धारू, गोपाळसिंग पाटील, रीतेश बारी यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निलेश सुरेश गडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
हिरालाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, माजी शहराध्यक्ष बाळु हेमराजे फेगडे यांच्यासह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष निलेश गडे यांचे स्वागत करण्यात आले. या बिनविरोध निवडीबद्दल माजी आमदार हरीभाऊ जावळे आदीनी त्यांचे अभिनंदन केले.


