भारत निर्माण योजनेंतर्गतच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई हवी

आमदार एकनाथराव खडसे यांची विधान परीषदेत मागणी


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथे भारत निर्माण योजनेंतर्गतच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरीषदेत मागणी केली.

गैरव्यवहाराबाबत वेधले लक्ष
आमदार खडसे म्हणाले की, चिखली (ता.मुक्ताईनगर) येथे भारत निर्माण योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परीषद उपविभाग, मुक्ताईनगर यांनी केलेल्या चौकशीत रुपये 16 लाख 92 हजार 68 एवढ्या रक्कमेची तफावत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जळगाव जिल्हा परीषद यांनी 27 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर यांना चौकशी अहवालाप्रमाणे रुपये 16 लाख 92 हजार 68 रुपये इतकी रक्कम संबंधित तांत्रिक सेवा पुरवठादार, तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्रामपाणी पुरवठा स्वच्छता समिती, चिखली (ता.मुक्ताईनागर) यांच्याकडून वसूल करण्याबाबत तसेच वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यास आरआरसी किंवा फौजदारी कार्यवाही करण्याबाबत कळविले होते. असे असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

अहवाल प्राप्त होताच कारवाई
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रक्कमेची तफावत असल्याची बाब निदर्शनास आली असून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परीषद, जळगाव यांनी 21 फेब्रुवारी 2023 रोजीच्या पत्रान्वये आर.आर.टी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, ईस्लामपूर सांगली यांना त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करण्याकामी नेमण्यात आले होते मात्र त्रयस्थ संस्थेबाबत संबंधित समिती सदस्य यांनी आक्षेप घेतल्याने त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करण्यासाठी सदस्य, सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांनी अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती नियोजन संकल्पचित्र व यंत्रणेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !