विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाशी समरस होवून लक्ष साध्य करावे : यजुवेंद्र महाजन


फैजपूर : विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाशी समरस होवून करीअरवर लक्ष साध्य करावे आणि कोणतेही काम करतांना ते सर्वोउत्कृष्ट करण्यासाठी अथक परीश्रमांची पराकाष्टा करण्याचा सराव करावा, असा मूलमंत्र दीपस्तंभचे यजर्वेंद्र महाजन यांनी येथे दिला. मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड, जि.जळगाव यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे गुणवंत विद्यार्थी स्वागत सोहळ्यात ते बोलत होते. शुभ दिव्य मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथाचे आधारवड व दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशन जळगावचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या प्रात्यक्षिक अनुभवाच्या गुरुकिल्लीने उपस्थित विद्यार्थी व शिक्षक पालक भारावून गेले. यावेळी त्यांच्याहस्ते पंचक्रोशीतील विविध गुणवंत विद्यार्थ्यांना मातोश्री फाऊंडेशनच्या माध्यमातून स्मृतीचिन्ह, मेडल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी लेवा भातु्र मंडळ पिंपरी, सौदागर पुणे समाज सेवक माजी मुख्याध्यापक अशोक भंगाळे होते. शासनाच्या विविध स्पर्धा शिष्यवृत्ती परीक्षाचा आढावा देवून हुशार होतकरू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेत उच्च शिक्षणाचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्राथमिक शाळेपासूनच सराव करावा. असे आवाहन भंगाळे यांनी केले. याप्रसंगी मातोश्री फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी यजुवेंद्र महाजन यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन चतुर राणे तर आभार मुख्ताधपक सलीम तडवी यांनी मानले. यावेळी सभा मंचावर उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, माजी मुख्याधपिका मधुबाला जंगले, सुमन चौधरी, मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी, शुभदिव्य मंगल कार्यालयाचे निलेश चौधरी, कला अविष्कारचे व्ही.ओ.चौधरी, पार्थ चौधरी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !