मणिपूर घटनेच्या निषेधार्थ 9 रोजी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा


भुसावळ : मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडी व जळगाव जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच नियोजन बैठक पद्मालय शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे परंतु सद्यस्थितीत देशात आदिवासी जमातींवर वारंवार होणार्‍या अन्यायाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय सर्वच आदिवासी संघटनांनी घेतला आहे.

यांची बैठकप्रसंगी उपस्थिती
याप्रसंगी मोर्चाचे जिल्हा समन्वयक, वंचितचे माजी युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, वंचितचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, महानगराध्यक्ष ललित घोगले, आदिवासी एकता परीषदेचे सुनील गायकवाड, आदिवासी टायगर सेनेचे पंढरीनाथ मोरे, जय आदिवासी युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष अमित तडवी, मुकेश वाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, आदिवासी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विराट जनआक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान मोर्चाचे समन्वयक बाळा पवार यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !