यावलला महसूल विभागाची धडक कारवाई : अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
Yawal Revenue Department raid: Tractors transporting illegal secondary minerals caught यावल : भुसावळ रस्त्यावर फालक नगराजवळ महसूलच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले तर ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने हे ट्रॅक्टर तहसीलमध्ये जमा करण्यात आले असून संबंधिताला दंडात्मक नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अवैध गौण खनिज धारकांमध्ये खळबळ
यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील फालक नगराजवळ महसूलच्या गस्ती पथकाला अवैध वाळू वाहतूक करतांना ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच.34 बी. एफ. 1260) आढळल्यानंतर ट्रॅक्टर चालक कमलाकर कोळी याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारण्यात आल्यानंतर तो नसल्याने ट्रॅक्टर तहसीलमध्ये जमा करण्यात आले. ट्रॅक्टर मालक ज्ञानेश्वर अनिल सोनार (यावल) यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तलाठी ईश्वर कोळी, अंजाळे तलाठी एस.व्ही.सूर्यवंशी, वसीम तडवी, विलास नागरे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक धारकांमध्ये खळबळ उडाली.








