रेल्वेतील गोळीबारात ठार झालेल्यांच्या वारसांना भरपाईसह हवी नोकरी
भुसावळात मुस्लीम मंचतर्फे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन
The heirs of those killed in the train firing want jobs with compensation
भुसावळ : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आर.पी.एफ.कर्मचारी चेतन सिंग यांनी रेल्वे आरपीएफ कर्मचार्यासह अन्य तीन प्रवाशांची गोळी चालवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा शहरातील मुस्लिम मंचने निषेध केला असून प्रशासनाने मृत प्रवाशांच्या वारसांना भरपाई द्यावी तसेच शासकीय नोकरी देण्याची मागणी यावेळी प्रांताधिकारी प्रशासनाकडे करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच भारतीय रेल्वे मुंबई विभागाचे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
या मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन
मृत आरपीएफ सब इन्स्पेक्टर मीना यांना शहिद घोषित करून त्यांना मरणोत्तर पारीतोषिकासह त्यांच्या मुलास कायमस्वरूपी रेल्वेत नोकरी द्यावी, मृत प्रवासी अब्दुल कबीर भाई, अख्तर अब्बास अली व मोहम्मद हुसेन यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्यावी, आरोपी चेतन सिंग गोळी याच्या वक्तव्यावरून त्याच्या मनात एका समाजाविषयी असलेली चीड पाहता त्याची सखोल चौकशी करावी, द्वेषपूर्ण भाषण देणारे तसेच धार्मिक व सामाजिक पुरुषांची विटंबना करणार्यांसाठी विशेष कायदा बनवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देताना माजी नगरसेवक साबीर शेख, सलीम पिजारी, जुनेद अशरफ खान, युसूफ खान, मुस्लिम कब्रस्तान अध्यक्ष मुझईद, एमआएम शहरध्यक्ष यूनुस मामा. शोएब भाई अल्पसंख्यांक राष्ट्रवादी शहराध्यक्ष नजर भाई, सोहेल पठाण, डॉ.इमरान खान, अकबर सर, शाकिर पिंजारी आदी उपस्थित होते.
