जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी बोदवडला बैठक
बोदवड : मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व जळगाव जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने बुधवार, 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी बोदवड शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
मणिपूरची घटना निंदणीय : बाळा पवार
मोर्चाचे समन्वयक बाळा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मणिपूर येथील घटना अतिशय निंदनीय असून देशाच्या इतिहासाला कलंकित करणारी आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली असून महिला वर्गामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बोदवड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे. यावेळी आदिवासी एकता परीषदेचे सुनील गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

या बैठकीला वंचितचे तालुकाध्यक्ष सुपडा निकम, महिला अध्यक्ष प्रमिला बोदडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गजानन खोडके, जगन गुरचळ, रावण साम्राज्य ग्रुप, सलीम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीचे मुख्य आयोजक अमोल बावस्कर, कुमार बोदडे कुणाल बोदडे, सागर तायडे होते.
