भुसावळात उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार


भुसावळ- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवार, 26 रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलच्या जाहीर नागरी सत्कार होणार आहे. गुलाबराव पाटील मित्र परीवाराने या कार्यक्रमाचे आयेाजन केले आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गुलाबराव पाटील मित्र परीवाराने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !