आमदार शिरीष चौधरी यांची शेळगाव प्रकल्पाला भेट
यावल : आमदार शिरीष चौधरी यांनी शेळगाव प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. प्रकल्पाच्या कामाचे कंत्राटदार पायोनियर बिल्डर्स आहेत. आमदारांनी कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. हे काम गतीने चालू ठेवून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून यावर्षी पाणी साठा करण्यासाठी प्रकल्प पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रलंबित संकल्पनाबाबत मुख्य अभियंता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याशी दूरध्वनीवरून प्रकल्पाचे संकल्पण लवकर मिळण्याबाबत चर्चा केली. कामाची प्रगती बघून आमदार चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.
उपास सिंचनबाबत पाठपुरावा करणार
उपसा सिंचन योजना मंजुरी विषयी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. उपसा सिंचन योजनेद्वारे यावल तालुक्यातील 19 गावांना सिंचनाचा फायदा होऊन नऊ हजार 128 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मौजे अंजाळे व पिळोदा या दोन फुलांचे काम प्रगतीपथावर असून मौजे कडगाव व मौजे शेळगाव बामणोद या दोन पुलांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता पी.आर.मोरे, पंचायत समिती काँग्रेस गट नेते शेखर पाटील, राजू कारंडे, सुरेश पाटील, के.पी.पाटील, सागर धनशेट्टी, उपविभागीय अभियंता एम.डी.सोनवणे, उपविभागीय अभियंता डी.एम.मोरे, उपविभागीय अभियंता ए.जी.सय्यद, क्षेत्रीय अभियंता एम.एन.रेगे, एच.डी.सोनवणे सी.जी.पंडित आदी उपस्थित होते.



