भुसावळात पाणी पेटले : पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न


Water caught fire in Bhusawal: Self-immolation attempt at water treatment plant for water भुसावळ : पालिकेच्या ढिसाळ नियोनामुळे शहराला 14 दिवस उलटूनही पाणी मिळत नसल्याने जनभावना तीव्र झाल्या असतानाच चक्क पाणी मिळण्यासाठी माजी नगरसेविका पतीने पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न टळला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी वाजेपर्यंत या भागात पाणी सोडले गेले नाही तर कोणालाही काहीही न सांगता शुध्दीकरणाच्या टँकमध्ये उडी मारून आत्मदहन करणार असल्याचे पाटील म्हणाले.

या भागात पाणीप्रश्न गंभीर
शहरातील देना नगर, लक्ष्मी नारायण नगर, कस्तुरी नगर या भागात गेल्या 14 दिवसांपासून पालिकेतर्फे पाणी आले नसल्याने नागरीक वैतागले आहेत. पाणीपुरवठा विभाग उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने संतापात अधिकच भर पडली आहे. संतप्त महिला व पुरूषांनी गुरूवारी पालिकेच्या फिल्टर हाऊसवर मोर्चा नेला होता. यावेळी किशोर पाटील यांनी पाणी येत नसल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. लोक प्रतिनिधी असतांनाही पालिकेकडून चुकीची माहिती मिळत असल्याचे आरोप पाटील यांनी केला. प्रभाग 22 मधील लोक संतप्त झाले असून पाणी येत नसल्याने पाटील यांनी जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी शुध्दीकरण होत असलेल्या मोठ्या हौदात आत्मदहन करण्यासाठी उडी मारत असतांना पालिकेचे कर्मचारी व त्यांच्या सोबत आलेल्या नागरीकांनी पाटील यांना ओढून त्यांची समजूत घातली.

पाणी न आल्यास आत्मदहन
किशोर पाटील यांनी पाणीपुरवठा अभियंता सतीश पाटील यांना सांगितले की, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यत नळांना पाणी आले नाही तर थेट जलशुध्दीकरण केंद्रात येऊन येथेच आत्मदहन, आत्महत्या करण्यात येईल तसेच या प्रकाराला पालिका प्रशासन, मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख जवाबदार असतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !