यावलमधील उपोषण चिघळले : दोघांची प्रकृती खालावली


The hunger strike in Yaval worsened: the condition of both deteriorated यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या झालेल्या अपहाराप्रकरणी संबंधीतांनी दिलेल्या अहवाल वरून चौकशी करून तत्काळ करवाई करण्याच्या मागणीसाठी यावल पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसलेले पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील व त्यांचे सहकारी रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी यांनी उपोषणाच्या सातव्या दिवशी उपोषण सुरूच ठेवल्याने रविवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वैद्यकीय सूत्रांच्या सुचनेवरून उपोषणार्थींच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याने तत्काळ उपोषणाच्या स्थळी रुग्णवाहिका आणत उपोषणकर्ते सलीम मुसा तडवी व रहेमान रमजान तडवी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अधिक गंभीर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी या प्रश्नी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अपहाराबाबत विशेष लेखा परीक्षण होणार
उपोषण ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जिल्हा परीषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित एस.पाटील यांची आमदार शिरीष चौधरींसह पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता सावखेडासीम ग्रामपंचायतीत झालेल्या अपहारप्रकरणी चौकशी तसेच विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसात संबंधीत अपहाराप्रकरणाचा लिखीत अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. फ

दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, माजी आमदार रमेश चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यानी व पदाधिकारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला. उपस्थितांनी पंचायत समिती प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !