सावखेडासीमच्या 33 वर्षीय तरुणाची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या
A 33-year-old youth of Sawkhedaseem committed suicide by consuming poison यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील रहिवासी 33 वर्षीय तरुणाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. तत्पूर्वी हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले येथे प्रथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भूषण अशोक पाटील (33) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भूषण हा तरुणाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केला व हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवताच प्रथमोपचार करून त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.








