वाळूची अवैध वाहतूक रोखताना महसूल पथकास दमदाटी : भुसावळात तिघांविरोधात गुन्हा


The revenue team was forced to stop the illegal transport of sand: a crime against three people in Bhusawal भुसावळ : अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकार्‍यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनजवळ अवैधरीत्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात असताना महसूल प्रशासनाने एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले मात्र कारवाईला विरोध करीत दोघांनी पथकाला दमदाटी करीत शासकीय कारवाईत अडथळा आणल्याने दोघांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी मंडळाधिकारी योगीता योगेश पाटील (जामनेर रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रॅक्टर चालक तथा संशयित आरोपी सुधाकर मधुकर सोनवणे (46, खडका, बजरंग बली मंदिराजवळ, भुसावळ) हा विनापरवाना वाळू वाहतूक करताना त्यास स्टार लॉननजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अडवल्यानंतर संशयित गिरीश तायडे व योगेश तायडे (खडका, ता.भुसावळ) हे स्कॉर्पिओ वाहनातून आले व त्याने पथकाशी हुज्जत घालून त्यांना दमदाटी करीत शासकीय कर्तव्यात अडथळा आणला. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !